Posts

  संस्कार संस्कार म्हणजे काय? मूल संस्कारी आहे म्हणजे मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या वेळोवेळी पाया पडणे, चांगला अभ्यास व देवधर्म या सवयी तिला किंवा त्याला आहेत असं म्हणायचे. हल्लीच्या काळात हे निकष थोडे वेगळे आणी कालानुसार आधुनिक असतील पण गर्भितार्थ तोच. एखाद्या व्यसनाधीन वा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर वाईट संस्कार झाले आहेत असं मानलं जातं. खरं तर संस्कार हे दुसरे तिसरं काही नसून लहानपणी तुमच्या मन:पटलावर कोरल्या गेलेल्या आठवणी असतात. वय वर्ष शून्य ते आठ या कालात मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी या इतक्या कायमस्वरूपी असतात की उरलेलं सगळं आयुष्य या आठवणी, अनुभवांमधून स्वत:बद्दलची जी प्रतिमा घडते (व्यक्तिमत्व) त्या दृष्टीकोनातून ती व्यक्ती जगते. आईच्या पोटात असतांना सातव्या महिन्यातच बाळाची श्रवणेंद्रीये विकसीत व्हायला सुरूवात होते. अभिमन्यू आईच्या गर्भात असतांना चक्रव्यूहाचा भेद करायला शिकला हि केवळ महाभारतातली कथाच नाही, होणारे पालक गर्भावस्थेत असलेल्याआपल्या अपत्याबरोबर आजसुध्दा संवाद साधू शकतात. या साठी तंत्र विकसीत केलं गेलय आणी मनाला थक्क करणारे प्रयोगांचे दाखलेही उपलब्ध आहेत...